Baramati News l 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या बातमीची दखल : कोऱ्हाळेच्या युनियन बॅंकेने अदा केले लाडकी बहीण योजनेचे पैसे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोराळे बुद्रुक : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बॅंक खात्यात जमा होवूनही कोराळे बुद्रुक येथील युनियन बॅंक खाते फ्रिज असल्याचे कारण सांगत मजूर महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे देत नसल्याने सोमेश्वर रिपोर्टरने याबाबत विस्तृत बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी प्रसिद्ध होताच बॅंकेने खाती सुरू करून महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे अदा केले आहेत. 
           एका ठगाने महिलांची फसवणूक करून त्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलून पोबारा केला होता. मात्र कर्ज महिलांच्या नावे पडल्याने त्यांची बॅंक खाती फ्रिज करण्यात आली होती. वास्तविक राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाने महिलांची कोणत्याही कारणांनी फ्रिज असलेली खाती सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र असे असताना बॅंकेने खाती सुरू केली नव्हती. त्यामुळे महिलांना पैसे मिळत नव्हते. या महिलांनी या योजनेचे प्रणेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही दाद मागितली होती.
      अखेर सोमेश्वर रिपोर्टरने याबाबत रोखठोक बातमी प्रसिद्ध करताच बॅंकेने या महिलांची खाती सुरू केली व महिलांना न्याय मिळाला व त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले. त्यामुळे या महिलांनी सोमेश्वर रिपोर्टरचे आभार मानले आहेत.
----------------
ऐन रक्षाबंधनाच्या सणाला आम्हाला पैसे मिळाले नाहीत मात्र बातमी लागताच आम्हाला तात्काळ पैसे मिळाले त्यामुळे सोमेश्वर रिपोर्टरचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
मधुरा चव्हाण, लाभार्थी महिला
To Top