सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
आज आम्ही जे आहोत ते केवळ तुमच्या प्रेमामुळे आहोत हे आम्ही कधीच विसरणार नाही त्यामुळे तुमच्या साठी जे जे करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खा सुनेत्रा पवार यांनी चोपडजकरांना दिले मात्र आपल्या तालुक्यात इतक काम करून ही लोकांना त्याची तमा नाही अशा शब्दांत लोकसभेच्या पराभवाची खंत त्यांनी व्यक्त केली.
चोपडज येथे १ कोटी ५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पार पडलेल्या सभेत सुनेत्रा पवार बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मला भोर, मुळशी, वेल्ह्याच्या दुर्गम भागात गेले होते. त्या भागातही दादांच्या माध्यमातून प्रत्येक गावात लाखो रुपयांची कामे झाल्याचे समजले. मात्र लोकसभा निकालानंतर खूप अभ्यास केला. पहाटे पासून कामाला सुरुवात करणारे दादा एकमेव नेते आहेत. राज्यात इतर कुणी इतके काम करते का, यातून दादांचा काय वैयक्तिक स्वार्थ आहे का, हा दादांचा बिझनेस नाही तरी ते जिव ओतून काम करतात मात्र आपल्या लोकांना त्याची कदर नाही अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
पुढे त्या म्हणाल्या की, दादांवर लोक खूप प्रेम करतात. आज तुमच्यामुळेच दादा आहेत. हे आम्ही कधीच विसरणार नाही. समाजकारण करताना मी आता राजकारणी बनतेय. आता मी ही खासदार झालेय त्यामुळे तुमच्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. विकासकामे होत असताना लोकांनी त्याकडे लक्ष देवून चांगली कामे करू घ्या अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी सरपंच रुक्मिणी पवार, ग्रामपंचायत सदस्य जयश्री गाडेकर, सुधीर गाडेकर, स्वाती यादव, किरण तावरे, युवा नेते तुषार सकुंडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गडकरी, प्रमोद जगताप, मछींद्रनाथ निंबाळकर उपस्थित होते. प्रास्तविक सागर गायकवाड यांनी केले तर आभार संदीप गाडेकर यांनी मानले.
COMMENTS