Pune Breaking l काचा उतरवताना फुटल्याने चार जणांचा मृत्यू : एक गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात अपघात झाला आहे, या अपघातात कारखान्यात काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. 
        पुण्यात कोंढवा नजीक येवलेवाडी भागात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका काचेच्या कारखान्यात माल उतरवला जात होता, त्यावेळी काचा फुटल्याने पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. या कामगारांना  रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण चार कामगारांचा मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी आहे. या चारही कामगारांचे मृतदेह सध्या ससून रुग्णालयात आहेत.
To Top