Baramati News l बारामतीतील राष्ट्रीय लोकन्यायालयात ५ हजार ९०५ खटले निकाली : सव्वा सात कोटी रुपयांची वसुली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
 बारामती येथील जिल्हा न्यायालयात  शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीमध्ये एकूण 5905 खटल्यांचा निपटारा झाला असून  72214643 (सात कोटी बावीस लाख चौदा हजार सहाशे 
त्रेचाळीस )रुपयांची वसुली झाली आहे .
       बारामती चे मुख्य जिल्हा न्यायाधीश व्ही.सी बर्डे, जिल्हा न्यायाधीश  न्यायाधीश  2 आर के देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  न्यायाधीश वर्ग व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बर्डे ,पॅनल सदस्य  वकील यांचे संयुक्त विद्यमाने हे लोक न्यायालय पार पडले. 
      एकूण सहा पॅनल मध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 व्ही,सी बर्डे ,जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 आर के देशपांडे ,दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर  एस टी चिकने ,श्रीमती व्ही.व्ही.पाटील, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती डी डी.पी पुजारी , श्री पी.पी काळे कोर्ट,यांचेसह बारामती बार मधील वकिलांनी काम केले. 
      सदर लोक न्यायालय मध्ये  दाखल पूर्व प्रकरणांमध्ये तीन कोटी सात लाख 88 हजार 387 रुपयाची वसुली झाली, मोटार अपघाताचे 29 खटले निकाली निघाले त्यामध्ये एकूण दोन कोटी 97 लाख साठ हजार रुपयांची नुकसान भरपाई पिडीतांना मंजूर करण्यात आली, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कायदा, पाणी बिले वसुली,महसुली दावे   करसंबंधीचे( रेवेन्यू) चे दावे मोठ्या प्रमाणात निकाली निघाले त्यामुळे एकूण 5905 खटले निकाली निघाले असून 7 कोटी 22 लाख 14 हजार  643 इतक्या रकमेची वसुली झाली.
 लोक न्यायालयामध्ये होणाऱ्या तडजोडी ला अनन्य साधारण महत्व असून  न्यायालयीन दिरंगाई पासून पक्षकाराला संरक्षण मिळते त्यामुळे  लोकन्यायालयात जास्तीत जास्त पक्षकारांनी सामील होवून आपल्या खटले तडजोडी द्वारे खटले मिटवल्यास कायदेशीर सोपस्कारामुळे होणारा विलंब टळू शकतो असे मत जिल्हा न्यायाधीश 1 व्ही.सी.बर्डे,  व जिल्हा न्यायाधीश 2 आर के देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केले.
      बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ,सदस्य व पॅनल वरील सर्व सदस्यांचे देखील आभार बारामती चे मुख्य जिल्हा न्यायाधीश 1 श्री व्ही. सी.बर्डे यानी मानले.
------------------------    
मोटार अपघात खटला अवघ्या  सहा महिन्यात निकाली
आज झालेल्या लोक अदालतीमध्ये बारामती येथील ऍड.गणेश आळंदीकर  व ऍड.विशाल बर्गे यांनी अवघ्या सहा महिन्यापूर्वी मोटार अपघातात जखमी ला नुकसान भरपाई मिळने साठीचा खटला दाखल केला होता. विमा कंपनी ने तडजोड केल्याने अवघ्या सहा महिन्यात हा खटला निकाली निघाला. जिल्हा न्यायाधीश व्ही.सी.बर्डे यांचे न्यायालयात हा खटला होता. जिल्हा न्यायाधीश 2 आर के देशपांडे यांचेसमोर हा खटला निकाली निघाला.
To Top