सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बारामतीने शालेय विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी दोन दिवशीय रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड अर्थात रायला आयोजित केला होता.
विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकास कार्यशाळेचे उदघाट्न सायरस पुनावाला शाळेच्या प्राचार्या यशोमती निगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे ज्ञान देण्याचा रोटरी इंटरनॅशनलचा रायला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. रोटरी क्लब ऑफ बारामतीने आयोजित केलेल्या या रायलामध्ये होणारी व्याख्याने आणि प्रत्यक्षिके मुलांना व्यक्तिमत्व विकासात नक्कीच उपयोगी पडतील. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, सचिव रविकिरण खारतोडे, युथ डायरेक्टर ऍड. अक्षय महाडिक उपस्थित होते.
कार्यशाळेतील पहिल्या सत्रात विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख आणि प्रसिद्ध कथाकथनकार, गझलचे अभ्यासक प्रा. डॉ. विजय काकडे यांनी कथा कशी जन्माला येते, ती लिहावी कशी आणि सांगावी कशी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. विजय काकडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या दोन कथा ऐकविल्या तसेच काही गझल सादर केल्या. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र शासनाचा उकृष्ठ शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि प्रसिद्ध हस्ताक्षर तज्ज्ञ कृष्णा कुदळे यांनी लिहावे कसे याविषयी मार्गदर्शन केले. आपले हस्ताक्षर चांगले असेल तर आपले व्यक्तिमत्व चांगले व्हायला मदत होते असे सांगतानाच त्यांनी आयुष्यातील शिस्त आणि नीटनेटकेपणा यासाठी तो आपल्या लेखनात असायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.भारत ज्ञान विज्ञान समुदायचे बारामती तालुका सचिव नौशाद बागवान यांच्या सोबतीने
दुपारच्या सत्रात राजू बालगुडे गुरुजींनी अंधश्रद्धा आणि विज्ञान यावर मांडणी केली. यावेळी बालगुडे गुरुजींनी विद्यार्थ्यांना श्रद्धेच्या नावाखाली समाजात सामान्य जनतेची फसवणूक कशी केली जाते हे प्रात्यक्षिकांमधून दाखविले.
चौथ्या सत्रात प्रा. प्राजक्ता पवार - यादव यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगताना आज समाजात हवा,पाणी,ध्वनी प्रदूषित करण्याची एकप्रकारे स्पर्धा लागली असून ही स्पर्धा मानव जातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत घातक असल्याचे मत व्यक्त केले. आजच्या शालेय विद्यार्थ्यांची पर्यावरण संवर्धनातील भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी हे नीटपणे समजावून घ्यायला पाहिजे. पर्यावरण संवर्धनाची सुरुवात विद्यार्थ्यांनी आपल्या घरापासून करावी म्हणजे त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शिवानी सपकळ यांच्या योगा आणि झुंबाने करण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मुजताबा लोखंडवाला यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकास यावर मांडणी केली. आपल्या संविधानामधील वैज्ञानिक दृष्टीकोन विकास तत्वावर बोलताना लोखंडवाला म्हणाले, आपण प्रत्येक भारतीयांने जात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन विज्ञानाची चिकित्सा करायला शिकले पाहिजे मात्र आपण भारतीय कोणत्याही गोष्टीमध्ये जात -धर्म - पंथ- प्रांत आणून त्याची वैज्ञानिक चिकित्सा होणार नाही याची काळजी घेतो.
दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध आहार तज्ज्ञ सुभाषिनी दरेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा यावर मांडणी केली. शाळेत येताना विद्यार्थ्यांनी पूर्ण आहार करायला हवा, प्रोटीन, व्हिटॅमिन यासह वाढत्या वयातील मुलांचा आहार हा चौरस असला पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना बाहेरील आणि बंद पाकिटातील खाद्यपदार्थ देऊ नयेत अशा खाद्य पदार्थांमुळॆ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शाररिक वाढ होण्यात अडथळे निर्माण होतात.
तिसऱ्या सत्रात प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर रोटरीच्या कामाबाबत उपस्थितांना माहिती करून दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यशाळेत मार्गदर्शन केलेल्या पाहुण्यांचे आणि सहभागी विद्यार्थी व त्यांच्या शाळांचे आभार युथ डायरेक्टर अक्षय महाडिक यांनी आभार मानले. दोन दिवसांच्या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा डॉ. अजय दरेकर यांनी केले. रायला मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सहाय्यक प्रांतपाल राकेश गाणबोटे यांच्या हस्ते सहभागी शाळा आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर रायला कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी यशोमती निगडे आणि सायरस पुनावाला शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रोटरीचे सचिव रविकिरण खारतोडे, प्रा. डॉ. हणमंतरावं पाटील, पार्शवेंद्र फरसोले, दर्शना गुजर, शिवदास गुजरे, अब्बास नाशिकवाला, हर्षवर्धन पाटील, अलीअसगर बारामतीवाला, बाळासाहेब जगताप, प्रिती पाटील, शीतल कोठारी, जयश्री पाटील, मल्लिकार्जुन हिरेमठ,दत्ता बोराडे, संजय दुधाळ, रसिका गुजरे, स्मिता बोराडे अनुजा गरगटे, अथर्व गरगटे यांनी आणि रोट्रॅक्टच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
रायला मध्ये सायरस पुनावाला, बालविकास, अनेकांत, जनहित, शारदाबाई पवार, विद्या प्रतिष्ठानचे इंग्रजी माध्यम (सी बी एस इ ) या शाळांमधील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
COMMENTS