Baramati News l वाणेवाडीची 'मानसी' खेळणार राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत : पारनेर येथे पार पडलेल्या ५३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
नगर-पारनेर येथे शालेय विभागीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या यामध्ये वाणेवाडीच्या मानसी संदीप जगताप हिने ५३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. तिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
         दि. ३० सप्टेंबर रोजी भाळवणी ता. पारनेर जि. अहिल्यानगर याठिकाणी पुणे, नगर व सोलापूर जिल्यातील विभागीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. 
       गेल्या आठवड्यात भोर येथील जवाहर कुस्ती संकुलात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या यामध्ये मानसीने प्रथम क्रमांक पटकावला होता. तिला प्रशांत भोसले, मनोज सावंत, प्रशांत गायकवाड व चेतन यादव यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल मानसीचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
To Top