सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्ह्यात बहुचर्चित भोर विधानसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवून सलग १५ वर्षे बालेकिल्ला राखणारे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार चकवा देऊन काँग्रेसच्या बालेकिल्लाला धक्का देणारं का? विधानसभेला महायुतीतील सात जणांनी दावा ठोकला असल्याने थोपटे पुन्हा चौथ्यांदा बालेकिल्ला राखणार का अशा चर्चेला रंगत येवू लागली आहे.
भोर (भोर - वेल्हा - मुळशी) विधानसभा काँग्रेसचा पारंपारिक आणि हक्काचा मतदार संघ असून २ पंचवार्षिक वगळता ४५ वर्षांपासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे.राज्यात सर्वात मोठा दुर्गम डोंगरी भोर विधानसभा मतदारसंघ असल्याची ओळख आहे.
भौगोलिक दृष्ट्या भोर विधानसभा मतदारसंघ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये विस्तारलेला असून मतदार संघातील लोकसंख्या असून मतदार ४ लाख १२ हजार ४१४ आहेत.त्यात स्त्री -१ लाख ९३ हजार ०७९,पुरुष- २ लाख १९ हजार ३३१ तर तृतीयपंथी ४,अपंग -५ हजार ३८२ अशी आहे.विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मागील पंचवार्षिक मध्ये बहुतांशी विकास कामे करण्यात आलेली आहेत.मात्र मतदार संघात विकास कामे झाली असली तरी बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने औद्योगिक वसाहत होणे महत्त्वाचे होते.औद्योगिक वसाहत राजकीय श्रेयापोटी होत नसल्याने तरुणांमध्ये नाराजीचा सूर आहे.येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवार संग्राम अनंतराव थोपटे विरुद्ध महायुतीतील इच्छुक उमेदवार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट रणजित शिवतरे, भाजपचे किरण दगडे पाटील 
विक्रम खुटवड, शिवसेना शिंदे गट बाळासाहेब चांदेरे (मुळशी), कुलदीप कोंडे, शिवसेना उबाठा गट शंकर मांडेकर,भाजपा जीवन कोंडे,समीर घोडेकर असे आहेत.मागील पंचवार्षिकला आमदार थोपटे ९ हजार ५०० च्या मताधिक्याने विजयी झाले होते.सध्या तर भोर विधानसभेला अपक्ष कोणीही लढणार नसल्याचे चित्र आहे.
-----------------------
विधानसभा मतदारसंघात चर्चातर आमदार थोपटेंचीच
राज्यात सर्वात मोठा भोर विधानसभा मतदारसंघ दुर्गम डोंगरी असला तरी विकासाच्या मुद्द्यावर सलग तीनदा निवडून आलेले भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे आहेत.तळागाळातील तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून जनतेचा विकास हाच ध्यास मनी असल्याने मतदार संघात चर्चा तर आमदार संग्राम थोपटेंचीच असल्याचे समोर येत आहे.
---------------------
महायुतीतील इच्छुकांचा दांडगा जनसंपर्क
तालुक्यातील वाढती बेरोजगारी याचा मुद्दा हातात घेऊन महायुतीतील इच्छुकांनी आज तागायत भोर विधानसभेतील भोर,वेल्हा,मुळशीच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याने इच्छुकांचा दांडगा जनसंपर्क असल्याचे चित्र आहे.