सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
नियोजित महाड- पंढरपूर महामार्ग क्रमांक (९६५ डिडी) हायवे विस्तारीकरणास शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही.परंतु जमीन मोजणी प्रक्रिया व भुसंपादन प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी अशी मागणी सोमवार दि.३० आक्रमक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली.
गेले काही दिवस शेतकऱ्यांना व जागा मालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता,विश्वासात न घेता वृक्षतोड,जमीन मोजणी चालू आहे.त्याला शेतकऱ्यांनी कायदेशीर हरकत घेतली असून शासन पातळीवर शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा मिळावा, समृद्धी व शक्तीपीठ महामार्ग धर्तीवर बाजारभावाच्या किमान चारपट नुकसानभरपाई मिळावी अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.शिष्टमंडळात रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप खाटपे, अंकुश पारठे, रवी कुडले, विजय शिंदे, अजय कुडले यांचा समावेश होता.बाधित गावातील शेतकऱ्यांच्या वतीने संविधानात्मक मार्गाने यापुढे लढा अधिक व्यापक केला जाईल असा इशारा यावेळी सर्व शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केला.