पुरंदर l ज्युबिलंट कंपनीने राबविले नीरा रेल्वे स्टेशनमध्ये‌ स्वच्छता‌ अभियान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
नीरा ( ता.पुरंदर) येथील रेल्वे स्टेशनमध्ये‌ ज्युबिलंट इंग्रेव्हीया लि. व ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा २०२४ या अभियानां‌तर्गत सोमवारी‌( दि.३०) स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याची माहिती ज्युबिलंट इंग्रेव्हीया कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी दिली.
           नीरा - निंबुत ‌ येथील ज्युबिलंट भारतीया फाउंडेशनच्या माध्यमातून सतत वेगवेगळ्या योजना नीरा व आसपासच्या भागात राबविल्या जात असल्याचे मुजावर यांनी सांगितले.नीरा रेल्वे स्टेशनमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाात ज्युबिलंट इंग्रेव्हीया कंपनीचे हेड मेन्टेनन्स अधिकारी राजेंद्र राघव, प्रॉडकशन हेड डॉ. योगेश कोपरकर ,बायोकंपोस्ट हेड मधुकर घोगरे ,
बॉयलर इन्चार्ज गणेश पडोळे , किरण ठाकूर, महेंद्र तांक ,युवराज काळे ,सचिन जाधव ,अभिषेक पगारे ,
सूर्यकांत पाटील , नितीन फिरके व सर्व महिला अधिकारी  तसेच‌‌‌ ज्युबिलंट भारतीया फाउंडेशनचे अजय ढगे व रेल्वे अधिकारी सत्यनाम सिंग यांनी 
उत्स्फूर्त सहभाग घेतला.
----------------------------------------------------------------
To Top