सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील महूडे खोऱ्यात महुडेवरून भोरला येताना एमएच ०६ एस ८२८९ या एसटी बस महुडे गावाजवळील मोठ्या वळणावर साईड पट्टीवरून सरकल्याने अपघात झाला आहे.
ही घटना सोमवार दि.३० रोजी सकाळी घडली.या अपघातात १० प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून जखमींना भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.