सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पंचायत समिती भोर अंतर्गत भाटघर धरणक्षेत्रातील गावांसाठी तरंगता दवाखाना याचे यावर्षीच्या सत्राचे उद्घाटन पंचायत समिती भोरचे गटविकास अधिकारी माननीय किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते करून दवाखाना सुरू करण्यात आला.
१३ गावांना या या तरंगत दवाखान्याचा उपयोग होणार आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर, लॉंच चालक,राजेंद्र कंक, कृष्णा किंद्रे,ग्रामसेवक रणजित ननावरे उपस्थित होते..
या लॉन्चद्वारे धरणाच्या पलीकडच्या गावातील रुग्णांची सोय होणार आहे.आठवड्यातून दोन दिवस बुधवार, शुक्रवार ही लॉन्च उपलब्ध आहे.बुधवार हा दिवस बोपे, कुंबळे, वाघमाची घुमट,सांगवी, डेरे भूतोंडे या गावांसाठी तर शुक्रवार गुहिणी, खुलशी, चांदवणे, डेरे, भांडरवली, मळे, सुतारवाडी, नानवळे आणि असा प्रवास ही लॉन्च करणार आहे.