सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता पदी सुरेंद्र राजेंद्र भुतकर यांची नियुक्ती झाली आहे . त्यांनी नुकताच या पदाचा पदभार स्वीकारला आहे .
सुरेंद्र भुतकर हे मूळचे वाई येथील असून त्यांनी सहाय्यक अभियंता सेवा यापुर्वी त्यांनी, सातारा शहर ,रत्नागिरी जाकादेवी,सातारा त्यानंतर मेढा येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी पदभार स्विकारला आहे .डोंगराळ आणि दुर्गम अशा जावळी तालुक्यात विद्युत वितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी या नात्याने काम करणे अतिशय आव्हानात्मक आणि जिकारीचे असते त्यामुळे येथे काम करताना अतिशय नियोजनबद्ध काम करावे लागते . यापूर्वी सुरेंद्र भुतकर यांना पाटण कराड रत्नागिरी अशा तालुक्यातही त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम केले आहे . त्या कामाचे कौतुकही त्या त्या ठिकाणी झालेले असून त्यांचा सन्मान सत्कार झालेला आहे .त्यामुळे जावली तालुक्यातील उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भुतकर यांच्या माध्यमातून निश्चित चांगले काम होईल . अनेक प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वासही सावलीचे सरपंच विजय सपकाळ यांनी व्यक्त केला . विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंतापदी सुरेंद्र भुतकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार सावली गावचे सरपंच विजय सपकाळ व ओझरेचे माजी उपसरपंच अजित लकडे यांनी केला .
------------------
सुरेंद्र भुतकर उपकार्यकारी अभियंता मेढा जावळी तालुका दुर्गम आणि डोंगराळ असला तरी आम्ही या ठिकाणी तत्पर सेवा देऊ आणि प्रत्येक ग्राहकाची अडचणी समस्या प्राधान्याने सोडवू असेही श्री भुतकर यांनी सांगितले .
COMMENTS