सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
पिंपरे बु ता खंडाळा गावच्या हद्दीत गिरमेवस्ती येथे विहिरीवरील मोटार चालू करत असताना शॉक लागून अभिषेक रमेश धायगुडे वय 20 रा पिंपरी बु ता खंडाळा या युवकाचा मृत्यू झाला असून लोणंद पोलीस स्टेशन येथे याची नोंद करण्यात आली आहे
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळलेली अधिक माहीती अशी की मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास पिंपरे बु ता खंडाळा गावच्या हद्दीत गिरमेवस्ती येथे अभिषेक रमेश धायगुडे हा विहिरीवरील मोटर चालू करत असताना इलेकट्रीक शॉक लागून मयत झाला असून या घटनेची फिर्याद दत्तात्रय धायगुडे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहेया घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार भिसे हे करीत आहे
COMMENTS