सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, जि. रायगड. यांचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग अधिवास धोक्यात येऊन पर्यावरण संतुलन बिघडू नये म्हणून आज गणेश विसर्जनाच्या दिवशी समुद्र, नद्या, ओढे, नाले, तळी आणि तलाव यांचे कडेला श्री. गणेशाच्या मूर्ती बरोबर निर्माल्य ही पाण्यात जाऊ नये म्हणून निर्माल्य संकलनाची सेवा करण्यात येत आहे. याच निर्माल्याचे खत करून ते शेतकऱ्यांना वाटण्यात येते. अशीच निर्माल्य संकलनाची सेवा प्रतिष्ठानच्या निरा पंचक्रोशीतील सेवकाकडून श्री. दत्त घाट, निरा- पाडेगाव येथे घडताना दिसत आहे. यापूर्वीही प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण निरा नगरी आणि निरा नदी मोहीम खडतर परिश्रम घेऊन कचरा मुक्त करून स्वच्छ करण्यात आलेली होती.
पृथ्वीतलावर निसर्गाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु मानवाकडून जीवसृष्टीच्या जगण्याच्या अधिकारात छेडछाड होऊन जीवसृष्टीचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. श्री .गणेश विसर्जनामुळे त्याच्याबरोबर ठीक ठिकाणी निर्मlल्य ही पाण्यात टाकले जाते याच्यामुळे ओढे नदी नाले समुद्र यातील जीवसृष्टी मृत्युमुखी पडतेच पडते त्याशिवाय पाणी दूषित होते हेच निर्मल्य जनावरांनी प्लॅस्टिक सह खाल्ल्यास ती ही मृत्युमुखी पडतात.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा जि. रायगड या प्रतिष्ठानशी वैचारिक पातळीने संलग्न असलेल्या निरा पंचक्रोशीतील निरा समर्थ बैठकीतील सर्व श्री सदस्य या सेवकांनी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आज श्री. दत्त घाट, निरा- पाडेगाव येथे निरा नदीकाठी निर्माल्य संकलनाची सेवा राबवली आहे. या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी निरा,निंबुत, पाडेगाव, या ठिकाणचे गणपती बाप्पा विसर्जनासाठी येत असतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात निर्माल्य ही आणले जाते परंतु या प्रतिष्ठानच्या उपक्रमामुळे सर्व निर्माल्य गोळा केले जाते यामुळे निरा नदीचे वाहते पाणी स्वच्छ चकचकीत दिसत असून निरा नदीने मोकळा श्वास घेतला आहे. निर्माल्य संकलनाच्या सेवेने गणेश विसर्जनासाठी आलेले भाविक भरावून जात असून प्रतिष्ठानच्या कार्याला धन्यवाद देत आहेत.