जावली l ओंकार साखरे l कास पुष्प पठारावरील फुलांचा रंगसोहळा ऐन बहरात : सलग सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटकांची भेट

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा - ओंकार साखरे
नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांसाठी खास असणाऱ्या जगप्रसिध्द कास पुष्प पठार वरील फुलांचा रंगसोहळा ऐन बहरात आला असून सर्वत्र विविधरंगी फुलांच्या  गालिच्छांची चादर  पाहायला मिळत आहे. सलग चार दिवस सुट्टया आल्याने पर्यटकांची पठारावर गर्दी होऊ लागली आहेत.  
             रविवारी ऑनलाईन बुंकिंग केलेल्या तीन हजार पर्यटकांसह ऑफलाईन आलेल्या हजारो  पर्यटकांनी एकच गर्दी केली होती यामुळे घाटाई मार्गावरील वाहनतळासह कास तलाव कडील पार्किंग हाऊसफुल्ल झाल्याने वाहनांच्या पार्कींगची समस्या निर्माण झाली त्यामुळे अनेक पर्यटकांनी वाहने मुख्य रस्त्यावर पार्क करून पठारवर गेल्याने घाटाई फाटा व पठार परिसरात दुपारच्या सत्रात वाहतुक कोंडी झाली होती. काही वेळ पारंबे फाटा व घाटाई रोडवरून वाहतुक वळवण्यात आल्याने ऑन लाईन बुकींग करून आलेल्या पर्यटकांनसह कास बामणोली कडे जाणाऱ्या वाहतुकीला कोंडीचा फटका बसला मात्र दुपार नंतर वाहतुक सुरळीत झाल्याचे दिसुन आले.  एकाच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने नियोजनकार्त्याची दमछाक होताना दिसत आहे. 
             गेल्या सात आठ दिवसांपासून पावसांने उसंत घेऊन उन पावसाचा खेळ सुरु केल्याने फुलांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने
टोपली कारवीच्या जांभळ्या रंगांच्या फुलांचे गालिच्छे तर काही ठिकाणी चादर पाहयाला मिळत असल्याने हि फुले पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. त्या सोबत गुलाबी तेरडा, पाढरां धनगर फेटा, चवर,  पिवळी सोनकी, आभाळी, नाभाळी, सितेची आसवे,  टुथब्रश  आदी विविध जाती प्रजातीच्या फुलांचाही  चांगला बहर सुरू झाला असून रंग सोहळ्याची उधळण होऊ लागली आहे. येत्या महीनाभर फुलांची उधळण पहायला मिळणार असून पर्यटकांनी फक्त सुटीच्या दिवशीच अधिकची गर्दी न करता ईतर दिवशी वेळ काढून पठाराला भेट दिल्यास पठारावर जास्त वेळ थांबता येऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटता येईल.
          शनिवार रविवार या दोन्ही दिवसांत सात ते आठ हजार  पर्यटकांनी फुलांचा आनंद लुटल्याचे गर्दीवरून दिसून येत असून  दुपारी गर्दी च्या वेळी घाटाई मार्गावरील वाहनतळात शेकडो वाहने पार्क झाली होती मात्र बसेसची कमतरता झाल्याने वाहनतळ ते पठार  प्रवास करण्यासाठी पर्यटकांची रांग लागल्याचे दिसून आले.  अधुनमधुन रिमझीम पाऊस धुक्यासोबत वाहणारा गार वारा  त्यात फुलांचा  रंग सोहळ्याने पर्यटक आनंदून जाताना दिसून आले.  कास वर आलेले बहुतांश पर्यटक
बामणोली येथील बोटींग सह भांबवली वजराई धबधबा,  कास तलाव परिसरातील पर्यटनाला पसंती देताना दिसत असल्याने या ठिकाणीही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. 
------------------------
दरवर्षी सुट्ट्यांच्या दिवशी कास वर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली असून कास समितीने पठाराच्या आजूबाजूला असणाऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब केल्यास ही समस्या सोडवता येणार आहे. कुसुंबी मार्गे येणारी वाहने सह्याद्रीनगर मार्गे अंधारी ते कास अशी वळवल्यास कोंडी टाळता येणार आहे.

To Top