Khandala News l लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार उमेश कोळी यांचे हृदयविकाराने निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार उमेश बाळकृष्ण कोळी (वय 47, रा. कोळकी ता. फलटण) सोमवारी सकाळी 11 वाजन्याच्या सुमारास  जेजुरी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले  
  
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहीती अशी, हवालदार कोळी तपासकामी जेजुरी येथे गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते फलटण येथील कोळकी गावचे रहिवाशी होते. त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षतने केली होती. पाटण,कराड, फलटण  या ठिकाणी त्यांनी चांगले प्रकारे उत्तम सेवा बजावली. त्यांचा स्वभाव मनमिळावू  होता त्यांचा गुन्हेगारांवर वचक असल्याने त्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांवर त्यांचा वचक होता. त्यांच्या पश्चात पत्नी व परिवार आहे. त्यांच्यां दुखद निधनामुळे फलटण परिसरावर शोककळा निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
To Top