सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
जवळवाडी ता.जावली येथिल हनुमान मंदिरा समोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सभा मंडपासाठी अंकुशबाबा कदम यांचे कडून सभा मंडपासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थानी मानले आभार आहेत. व्यासपिठाचे उदघाटन अंकुशबाबा कदम यांचे शुभहस्ते करण्यात आले.
या सभामंडपाचा उदघाटन सोहळा अंकुशबाबा कदम यांचे शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी जेष्ठ नेते एस.एस.पार्टे गुरुजी,शिवसेना तालुका प्रमुख संतोष चव्हाण,संतोष बैलकर, मालचौंडी सरपंच संपत कदम, सुरेशबुवा जवळ,आण्णासाहेब धनावडे,विलासबाबा जवळ, सतिष मर्ढेकर,अशोक जवळ,सचिन जवळ,मंडळाचे अध्यक्ष सागर जवळ,उपाध्यक्ष रमेश पाटील, दत्ताबाबा जवळ, पत्रकार प्रमोद, ग्रामस्थ, महिला,युवक इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अंकुशबाबा कदम म्हणाले जावलीच्या मातीत मी जन्माला आलो.या मातीचे ऋण मला फेडायचे आहेत. जावलीच्या विकासाचा व्हिजन माझ्याकडे असून यासाठी जावलीकरांनी मला आशिर्वाद द्यावेत. यापुढे जावलीतून जास्तीत जास्त अधिकारी तयार व्हावेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना पार्टे गुरूजी म्हणाले जावली ही शुरांची,वीरांची आणि क्रांतीकारकांची भूमी आहे. जावलीच्या मातीत वाघ निर्माण करण्याची ताकद आहे.अंकुशबाबा तुम्ही व्हिजन घेवून पुढे चाला सामान्य जावलीकर आपल्या या लढाईत आपल्या सोबत असतील.विलासबाबा जवळ यांनी आपल्या प्रास्ताविकात जवळवाडी गावचे सण, उत्सव व परंपरा विषद करून इथला युवक जिद्द, चिकाटी व धाडशी असल्याने आभाळाला गवसणी घालण्याची ताकद या मातीत असल्याचे सांगितले.सतिष मर्ढेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करून शेवटी आभार मानले.