वेल्हे l मिनल कांबळे l रुग्णवाहिका व योग्य उपचार वेळेवर न मिळाल्याने आपल्या वडिलांना गमावले : वडिलांच्या स्मृतीनिमित्त दोन भावंडांनी दिली रुग्णवाहिका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
रुग्णवाहिका आणि योग्य उपचार न मिळाल्याने आपल्या वडिलांना गमवावे लागले हे दुःख आणि अतीव वेदना  काळजात घेऊन आपली परिस्थिती सुधारल्या नंतर ही वेळ इतरांवर येवू नये आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने कोणाला आपल्या प्रिय जणांना गमवावे लागु नये म्हणुन एम.बी.फाऊंडेशन  वेल्हा" यांच्या माध्यमातून सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका कोणताही बडेजाव न करता राजगड (वेल्हा ) येथील  गरिबांना मोफत तर ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांना फक्त देखभालीसाठी लागणारे पैसे देवून कोणत्याही अतिरिक्त पैसे अथवा नफ्याचा विचार न उपलब्ध करून दिली आहे.   
         तालुक्यात तोरणा राजगड लिंगाना किल्ले,  पानशेत, वरसगाव, गुंजवनी सारखी धरण, मढे घाट  ह्या प्रेक्षणीय स्थळांना लाखो पर्यटक भेट देतात आणि वाढलेली वाहनांची वर्दळ व  आपात्कालीन परिस्थितीत शासनाने दिलेल्या एका 108 रुग्णवाहिका 129 गावातील लोकांना किती पुरी पाडणार, म्हणुन वेल्हे येथिल संवेदनशील कुटुंबातील मंगेश (बाळासाहेब) विठ्ठलराव भोरेकर व प्रमोद विठ्ठलराव भोरेकर या
दोन भावंडांनी सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका दिली. याबाबत तालुक्यातून एम. बी. फाउंडेशन चें अभिनंदन होत आहे.

         
To Top