Baramati News l हार तुऱ्यांना फाटा देत.. ऋषी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराने उचलले १४ मुलांचे शैक्षणिक पालकत्व

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजेपूल येथे त्यांच्या मित्र परिवाराने वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते.                वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक भावनेच्या प्रेरणेने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी या हेतूने यावर्षी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा रुपी शैक्षणिक साहित्याच्या मदतीचे आव्हान मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.  या कार्यक्रमात १४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकतत्व ऋषी आबा मित्रपरिवाराच्या वतिने घेण्यात आले. या मुलांचा इयत्ता चौथी पर्यंत सर्व शैक्षणिक खर्च ऋषी आबा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन करण्यात आली. 
शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केक कापून ऋषीकेश गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपसरपंच प्रवीण गायकवाड, ग्रा.पं. सदस्य निलेश गायकवाड, सुहास गायकवाड, सागर गायकवाड, हरीश गायकवाड, मंगेश गायकवाड, योगेश गायकवाड, आकाश सावळकर, शरद ननवरे, सौरभ पवार हा मित्रपरिवार उपस्थित होता.
To Top