खंडाळा l पाडेगाव येथील १६ वर्षीय महाविद्यालयीन युवकाची वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोनंद : प्रतिनिधी
पाडेगाव ता. खंडाळा येथील समता कनिष्ठ महाविद्यालयतील १६ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातीलच खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. 
            देवराज प्रशांत धोतरे वय १६ रा. अकलूज ता. माळशिरस याने दि. २५ रोजी रात्री सव्वा बारा वाजता वसतिगृहातील खिडकीच्या लोखंडी गाजला दोरउडीच्या मदतीने आत्महत्या केली. याबाबत त्याचा मावसभाऊ विशाल विजय जाधव रा. लोणंद ता. खंडाळा याने लोणंद पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
To Top