Bhor News l भोरला दिवाळी फराळ साहित्य कूपन मिळवण्यासाठी हजारो महिलांची झुंबड : राजवाडा चौकात जाणारी वाहतूक ठप्प

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 भोर शहरात सामाजिक कार्यकर्ते किरण दगडे पाटील (भाजपा) यांच्यावतीने मोफत दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात येणार असल्याने शहरातील राजवाडा चौकात तालुक्यातील हजारो महिलांनी पण मिळवण्यासाठी गर्दी केली.
      तालुक्याच्या विविध भागातून गावोगावच्या महिला राजवाडा चौकातील दगडे पाटील यांच्या कार्यालयात दिवाळी फराळ साहित्य कुपन अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावून गर्दी केली. या महिलांच्या गर्दीमुळे राजवाडा चौकात जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनचालकांना अडथळा निर्माण झाला असून काही वेळ वाहनचालक त्रस्त झाले.दिवाळी फराळ साहित्य कुपन अर्ज भरण्यासाठी शहराबाहेर कार्यालय उभारून अर्ज घेण्यात आले असते तर शहरात होणारी गर्दी दळली असती तर वाहन चालकांना होणारा त्रास कमी झाला असता असे वाहनचालकाकडून सांगण्यात आले.
----------------------
५० हजार कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्याचा मानस
 मागील दहा वर्षांपासून चाळीस हजार कुटुंबीयांना दिवाळी फराळ साहित्य वाटपाचे कामकाज सुरू आहे.यंदा भोर विधानसभा (भोर ,राजगड, मुळशी)मतदारसंघात ५० हजार कुटुंबीयांना मोफत दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्याचा मानस असल्याचे सामाजिक कार्यकर्ते किरण दगडे पाटील (भाजपा )यांनी सांगितले.
To Top