Phaltan Breaking l जाधववाडी येथे बैलगाडा शर्यतीत मारहाण : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्दच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
जाधववाडी ता. फलटण गावाच्या हद्दीत बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या वादातून एकाला कोयता,काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण  करून दमदाटी केल्याप्रकरणी नऊ जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 मिळालेली अधिक माहिती अशी, दि २५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास  जाधववाडी, ता. फलटण, येथील साईबाबा मंदिरासमोर  भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती  बैलगाडी एकाच गटात पळवु नको असे म्हणुन फिर्यादी विजय बबन मदने, वय- ३५ वर्षे रा. उमाजी नाईक चौक, फलटण यांना मारुती पांडुरंग खोमणे,ऋषी तानाजी जाधव, विशाल विठ्ठल कडाळे, शामराव मदने (पुर्ण नाव माहीत नाही), हनुमंत शिवाजी जाधव, तेजस मारुती खोमणे व इतर तीन अनोळखी इसम सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे या संशयतांनी शिवीगाळ, दमदाटी करुन कोयत्याने, काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी खाली पाडुन मारहाण करुन जखमी करुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास महिला पो.ना. पूनम तांबे करीत आहेत. 
To Top