Dam Update l विजय लकडे l धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला : निरा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रातील निरा देवघर, भाटघर, गुंजवणी व वीर ही चारही धरणे १०० टक्के भरली असून काल रात्री पासून सुरू झालेल्या पाऊसमुळे वीर धरणातून निरा नदी पत्रात १४ हजार ७६१ क्यूसेसने निरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. 
          आज दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, एकूण पाऊस आणि धरणातील पाणी साठे खालीलप्रमाणे गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४ मि.मी. एकूण २८४९मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा व ७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहेभाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मि.मी. एकूण १३००मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला आहे धरणातून १६१४ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३० मि.मी. एकूण २५४० मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० पाणी साठा झाला असून ७५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३ मि.मी. एकूण ५३२ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला असून १४ हजार ७६१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहेचारही धरणात मिळून १००% पाणीसाठा व धरणात एकूण ४८.३ टीएमसी पाणीसाठा असून मागील २४ तासात चारही धरणात मिळून ०.४ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 
To Top