सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या उत्तरेकडील बत्तीसगाव खोऱ्यातील कांबरे खुर्द ता. भोर येथे रोटरी क्लब ऑफ भोर-राजगड व एच.व्ही.देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात ८० जणांची नेत्र तपासणी करून मोफत चष्मे देण्यात आले.
दुर्गम डोंगरी भागातील लोकांची नेत्र तपासणी व्हावी या उद्देशाने शिबिर आयोजित करण्यात आले. होते.शिबिराचा गोरगरीब लोकांना फायदा झाला असून झाला असून पुढील काळात रोटरी क्लबच्या माध्यमातून अशीच वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबिरे भरवावीत असे नागरिकांकडून आयोजकांना सांगण्यात आले. यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. रूपाली म्हेत्रे,डॉ. स्मिती दीडवाणीया,डॉ. प्रियंका सावळे ,दत्तात्रय खुळे, सरपंच मनीषा सुदाम ओंबळे ,उपसरपंच रेश्मा खुळे, संपत मळेकर, किरण चिकणे,गणेश खुळे, ग्रामपंचायत सदस्य मोहिनी शिळमकर,आरती चौधरी,अंकुश उल्हाळकर ,दत्तात्रय खुळे,लाला शेळीमकर ,नथुराम सुकाळे ,सुनील राजीवडे ,शंकर खुळे ,शिवराम खुळे, अशोक खुळे,दशरथ शिळीमकर ,गोकुळ चिकने आदींसह उंबरमाळ गणेश मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार रवींद्र खुळे यांनी केले.