Purandar News l वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर : प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालींदर कामठे यांची माहिती

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टिम------
गराडे : प्रतिनिधी
दरवर्षी शिक्षकदिनाचे औचित्य साधून वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सलग ३० वर्ष नियमितपणे देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालींदर कामठे यांनी दिली.
      बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. हिवरे( ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सर्व पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, घड्याळ, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
    गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते हे आहेत. प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक मेमाणे ,नंदकुमार सागर , नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एम. के. गायकवाड ,हिवरे सरपंच भारती गायकवाड, उपसरपंच रामदास कुदळे यांची आहे.
       वसंतदादा पाटील प्रतिष्ठान गुणवंत शिक्षक पुरस्कारांर्थीची जाहीर झालेली नावे पुढीलप्रमाणे
      १)प्रताप निवृत्ती मेमाणे (केंद्रप्रमुख पंचायत समिती पुरंदर  )
२)भगवान रावबा भिसे (मुख्याध्यापक डॉ. शंकरराव ढोणे विद्यालय, गराडे)
३) संजय लक्ष्मणराव भापकर( मुख्याध्यापक मा. दादा जाधवराव विद्यालय, जुनी जेजुरी)
४) वैशाली विजय हाडके (उपशिक्षिका महर्षी वाल्मिकी विद्यालय, कोळविहिरे)
५) मोहिनी अर्जुन कापरे (उपशिक्षिका यशवंत विद्यालय, मावडी क. प. )
६) सरला विठ्ठल शितोळे( उपशिक्षिका सद्गुरू कानिफनाथ विद्यालय, बोपगाव)
७) रुपाली सचिन घोलप (उपशिक्षिका म.ए.सो.वाघिरे विद्यालय, सासवड)
८)प्रशांत राजाराम बेंगळे (उपशिक्षक श्री. कानिफनाथ विद्यालय, भिवरी)
९)हनुमंत संभाजीराव निगडे( उपशिक्षक माध्यमिक विद्यालय, यादववाडी)
१०)रमेश सोपान शेवते (उपशिक्षक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, शिवरी)
 ११)गणेश निंबा माळी (उपशिक्षक डॉ. शंकरराव कोलते विद्यालय, पिसर्वे)
१२)शंतनू गौतम पवार (उपशिक्षक कर्मवीर भाऊराव पाटील हाय.व जु. कॉलेज ,परींचे)
१३) मनोजकुमार दत्तात्रय भागवत( उपशिक्षक रिसे- पिसे माध्यमिक विद्यालय, रिसे)
१४)मधुसूदन निवृत्ती जगताप( उपशिक्षक जिजामाता हायस्कूल व जु. कॉलेज, जेजुरी)
१५)गणेश नामदेव कोलते (उपशिक्षक राजुरी माध्यमिक विद्यालय, राजुरी)
१६) सोमनाथ बबन काळे (उपशिक्षक जि.प. प्राथमिक शाळा, टेकवडी)
१७)गणेश पांडुरंग लोणकर (उपशिक्षक जि.प. प्राथमिक शाळा, शिरसाटवाडी)
१८)कृष्णाजी साधू लवांडे (उपशिक्षक जि.प. प्राथमिक शाळा, चौडकरवाडी )
१९) अनिता सुभाष पाटोळे (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा, कटकेमळा)
२०)सरिता हेमंत टिळेकर (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा, बोराळेमळा)
२१) जयश्री गणेश मेमाणे (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा, सिंगापूर)
२२) सारिका कुंदन मदने (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा, गुळूंचे)
२३)चित्रा श्रीमंत धनवडे (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा,साकुर्डे)
२४) मायादेवी बिभिषण जाधव( उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा, शिदोबाचीवाडी)
२५)निलम यशवंतराव दगडे (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा, निरा नंबर-२)
२६)नंदा सुनील कांबळे (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा, माळशिरस)
२७)अर्चना श्रीधर वाघोले (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा, हरेश्वरमळा) 
२८)दत्तात्रय महादेव गायकवाड( लेखनिक सद्गुरू नारायण महाराज माध्यमिक विद्यालय, नारायणपूर)
२९)रणजित विजयसिह काळे( लेखनिक श्री. सिद्धेश्वर विद्यालय, नायगाव)
३०)संजय बाबुराव निगडे (शिपाई न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुन)
३१)सागर लक्ष्मण भगत (शिपाई वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय, पिंगोरी)
To Top