Baramati News l उपमुख्यमंत्री अजित दादांनी भाकरी फिरवली : बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांनी तालुक्यातील अनेक पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले होते. त्यामुळे नवीन निवडींकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. विधानसभेच्या तोंडावर आज तालुका पदाधिकारी निवडण्यात आले. यामध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी राजवर्धन शिवाजीराव शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे.
          बारामती येथे राष्ट्रवादी भवन कार्यलयात ही निवड पार पडली. खासदार सुनेत्रा पवार उपस्थित व पक्ष निरीक्षक सुरेश पालवे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली. राजवर्धन शिंदे गेली २४ वर्षापासून सोमेश्वर कारखान्याचे संचालकपद भूषवित असताना २००२ साली व २०१० या सालात दोन वेळा सोमेश्वर कारखान्याचे चेअरमनपद भूषविले आहे. तसेच १९९५-९६ साली बारामती दुध संघाच्या संचालकपदाबरोबर चेअरमनपद व व्हा. चेअरमनपद देखील भूषविले आहे. तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्षपद देखील भीषविले आहे.
        यावेळी बोलताना राजवर्धन शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीकारणासाठी प्रयत्न करणार, त्यांच्या विश्वासास पात्र राहून पक्षाचे काम सर्वसामान्य पोहचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार सुनेत्रा पवार, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष adv. केशवराव जगताप, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विक्रम भोसले, लालासाहेब माळशिकारे आदी मान्यवर उपस्थित होते. 
To Top