Bhor News l मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानात भोरचे रा.र.विद्यालय प्रथम तर जि.प.उत्रोली शाळा द्वितीय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा राज्यस्तरीय स्पर्धेत भोर तालुक्यातील राजा रघुनाथराव विद्यालय भोर प्रथम तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रोली द्वितीय क्रमांक मिळवून अभियानात दोन्ही शाळांनी बाजी मारली.
     खाजगी शाळांमध्ये राजा रघुनाथराव विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर जिल्हास्तरीय शाळांमध्ये जिल्हा परिषद उत्रोली शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेच्या माध्यमातून शाळांना भरघोस बक्षीस मिळाली असून शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे तालुकास्तरावरून कौतुक होत आहे.
To Top