सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
गुळुंचे ता. पुरंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नारायणराव गजानन निगडे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
गुळुंचे गावचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्या पश्चयात एक मुलगा, चार मुली जावई व नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे यांचे ते वडील होत. अंत्यविधी दि. १७ रोजी सकाळी ९ वाजता गुळुंचे येथे होईल.