सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल ( ता. बारामती ) येथील महिलांनी एकत्र येऊन प्रथमच नारीशक्ती नवरात्रोत्सव महिला मंडळ स्थापन केले या निमित्त नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत दुर्गा देवीची आराधना करून काल कोजागिरी पौर्णिमा साजरी केली.
बगावात राजकीय गट तट असले तरी पुरुष मंडळींमध्ये मनभेद नाहीत, करंजेपुल च्या सरपंच पूजा गायकवाड, उपसरपंच प्रवीण गायकवाड, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला सदस्या, व्यापारपेठेतील महिला तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी एकत्र येत सगळे भेद बाजूला ठेऊन खेळीमेळीत प्रथमच एकत्र येऊन दुर्गादेवीची स्थापना करून एकोप्याचा विशेष संदेश दिला.
दुर्गादेवीच्या स्थापनेपासून कोजागिरी पर्यंत महिलांसाठी महाभोंडला, फनी गेम्स,जागरण गोंधळ,शालेय मुलांसाठी बौद्धिक स्पर्धा,रास दांडिया, खेळ पैठणीचा इत्यादी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले,यामध्ये बाबुलाल पडवळ यांच्या खेळ पैठणीचा कार्यक्रमाने विशेष रंगत आणली सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन शमिका दगडे यांचेसह गावातील महिलांनी केले.
गावातील मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दररोज देवीची आरती करण्यात आली.खेळ पैठणीच्या कार्यक्रमातील पहिल्या विजेत्या महिला सीमा जगताप यांना अनिता गायकवाड यांचे वतीने पैठणी देण्यात आली तर सीमा मोरे, अमरजा जाधव, सारिका खैरे, पूजा पाटोळे या विजेत्यांना पुनम ज्वेलर्स च्या संचालिका, संगीता आळंदीकर व ऐश्वर्या आळंदीकर यांचे वतीने सोन्याचे कॉइन, सोन्याची नथ, चांदीच्या मूर्ती बक्षिस देण्यात आल्या. कोजागिरी कार्यक्रमाचे चे नियोजन महिला सरपंच पूजा गायकवाड यांचेसह संगीता आळंदीकर,स्नेहा गायकवाड, नम्रता गायकवाड,अनिता गायकवाड, कोमल गायकवाड,प्रियांका गायकवाड,सीमा मोरे, मासाळ मॅडम, शेख मॅडम, वायकर मॅडम इत्यादी महिलांनी केले.