सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
मिकी माउस कशी आहेस.. तु मला तु आवडतेस असे म्हणुन एका १७ वर्षीय पीडितेस अश्लील हावभाव करुन तिला लज्जा उत्पंन्न होईल असे वर्तन केल्याने दोघांवर पोक्सो अंतर्गत वडगाव निंबाळकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका १७ वर्षीय पीडितिने दाखल केलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी अविनाश नानासो पवार रा. वाणेवाडी ता. बारामती व तुषार सुरेश गुलदगड रा. पळशी ता. बारामती यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील पीडित ही मु.सा.काकडे कॉलेजमधील सायन्स बिल्डींग मधुन जात असताना अविनाश पवार याने वाईट नजरेणे पाहुन पीडितेस ‘‘मिकी माउस कशी आहेस, तु मला तु आवडतेस असे म्हणुन अश्लील हावभाव करुन पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे. तसेच अविनाश पवार हा सुमारे एक वर्षापासुन तर तुषार गुलदगड हा मागील सहा महिन्यापासुन पीडितेचा पाठलाग करुन फिर्यादीस अश्लिल इशारे करुन फिर्यादीवरती अश्लिल टोमणे मारुन वारंवार त्रास दिलेमुळे त्यांचे त्रासाला कंटाळुन मागील दोन महिन्यापासुन फिर्यादी हे एस.टी.बस ने येणेचा प्रवास बंद केला असुन ते या दोघांचे भितीमुळे महाविद्यालयाच्या एका शिक्षकासोबत त्यांच्या चारचाकी वाहनातुन कॉलेजमध्ये येत जात आहे. त्यानंतर पीडित ही बस स्टॅन्डवर येत नाही हे दोन्ही आरोपींना समजल्यावर त्यांनी पीडितेस कॉलेजमध्ये येवुन त्रास देण्याचे सुरुच ठेवले होते. या सर्व गोष्टींना त्रासून पिडीतेचे मानसीक स्थिती खुप खराब झाली असुन अभ्यासामध्ये देखील लक्ष लागत नाही.त्यामुळे घाबरुन सदर घडला प्रकार कॉलेजमधील प्राचार्य व शिक्षकांना सांगीतला. यानंतर पीडितेने पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.