सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जी भाषा रोजगार देते ती अधिक पुढे जाते. त्यामुळे मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर रोजगाराची भाषा बनविण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आवश्यक आहेत. काळ सुसंगत असे नवे अभ्यासक्रम तयार करून दिले पहिजेत, असे परखड मत पत्रकार राहुल शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन, भित्तीपत्रक शुभारंभ आणि व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त काकडे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कथा, कविता, लेख प्रसिद्ध करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'अन्वेष' या भित्तीपत्रकाचा शुभारंभ भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेचे संतोष शेंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने अत्यंत जुन्या व दुर्मिळ अशा मराठी व हिंदी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेचे कार्यकर्ते राजू बडदे यांनीही आधुनिक मराठी साहित्याच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविले होते. त्यांचाही चहा दुकानासोबत पुस्तक विक्री करत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने राहुल शिंदे यांचे 'मराठी भाषा आणि रोजगार' या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. याप्रसंगी डॉ. जवाहर चौधरी, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. अजय दरेकर, डॉ. राहुल खरात, डॉ. नारायण राजुरवार, डॉ. निलेश आढाव, डॉ. आदिनाथ लोंढे, प्रा. किरण मोरे, प्रा. नीलम देवकाते, डॉ. कल्याणी जगताप, प्रा. मेघा जगताप, शिल्पा कांबळे उपस्थित होते.
यानिमित्ताने डॉ. वायदंडे यांनी, सेवा क्षेत्रात, संगणक क्षेत्रात मराठी भाषेला अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. कला क्षेत्राला नवी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम अभ्यासक्रम दिले पाहिजेत. नव्या पिढीला मोबाईलकडून वाचनाकडे वळविले पाहिजे.
मराठी विभागप्रमुख डॉ. जया कदम यांनी प्रास्ताविक केले प्रा. अच्युत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. संजू जाधव यांनी आभार मानले.
COMMENTS