सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी
येथे भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय माननीय. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या 'वाचन प्रेरणा दिन' प्रा. विजय काकडे यांच्या 'वाचाल तर वाचाल' या
वाचनस्फूर्ती देणाऱ्या व्याख्यानाने संपन्न झाला.
इयत्ता सहावी ते इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा.विजय काकडे यांनी भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेल्या महान राष्ट्रभक्त ,समाजसुधारक तसेच थोर व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यातील छोटे पण मार्मिक प्रसंग सांगत वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. आपल्या ओजस्वी व कथाकथनावर प्रभुत्व असलेल्या भाषण शैलीने सभागृहात सर्व प्रेक्षकांना खेळवून ठेवले. पारंपारिक पुस्तक वाचनाबरोबरच आधुनिक वाचन संस्कृतीची आयुष्यात योग्य प्रकारे सांगड घालून व्यक्तिमत्व कसे घडवता येईल याबद्दलही सरांनी भाष्य केले.
यावेळी कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली कदम यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील ग्रंथपाल मनिषा जांबले यांनी केले.