सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
निंबुत ता. बारामती येथे ग्रामपंचायत निंबूत, सुनेत्राताई पवार महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, व सावित्री हॉस्पिटल लोणंद यांच्या संयुक्त विद्यमाने निंबुत येथील लक्ष्मीनगर येथे भव्य महिला सर्व रोग निदान मोफत शिबिर भरवण्यात आले होते,
बया शिबिरामध्ये दीडशे महिलांची इलेक्ट्रोकार्डिया ग्राफी, रक्तातील साखरेची पातळी, गर्भ चाचणी, तसेच सामान्य शारीरिक जनरल तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप नींबूत सरपंच निर्मला काळे, सोमेश्वर चे माजी संचालक महेश काकडे यांनी केले.
या शिबिरामध्ये महिलांची तपासणी डॉ. वैष्णवी पंदेरे, डॉ. दीप्ती शिवदे, डॉ. दत्तात्रय गंगावणे व सावित्री हॉस्पिटल लोणंद चा स्टाफ यांनी केली. या कार्यक्रमास उपसरपंच अमर काकडे, मा. उपसरपंच उदय काकडे, ग्रा सदस्य नंदकुमार काकडे, कुसुम काकडे, ग्रामविस्तार अधिकारी काळभोर, सुनेत्रा ताई पतसंस्था सचिव रोहिणी काकडे, इत्यादी उपस्थित होते. या शिबिरामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला गेला
शिबिराचे आयोजन महेश काका काकडे युवा मंच निंबूत, व नींबूत पंचक्रोशी यांच्यावतीने करण्यात आले होते.