सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोरला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पुणे - भोर मार्गावर गस्त घालत असताना सोमवार दि.३० सायंकाळी जळाऊ सरपन भरून वाहून नेताना दोन आयशर कंपनीचे टेम्पो वनविभागाने पकडून गुन्हा दाखल करीत कारवाई केली.
वनविभागाचे भोर वनपाल एस.एल.मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतः व वनरक्षक व्ही. आर.अडागळे, एस.ए.राठोड,के.एम.हिमोणे,श्रीमती पी.ए.माने सोमवार दि.३० सायंकाळी पाचच्या दरम्यान भोर-पुणे रस्त्यावर गस्त घालत होते.गस्त घालताना वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी दोन संशयित आयशर कंपनीचे दोन टेम्पो तपासणी करीत असताना जळावू सरपन व मिक्स किटा २१ घनमीटर आढळून आला.विविध प्रजातीचे वनउपज अवैधरित्या वाहतूक होत असल्याने वनविभागाने गुन्हा दाखल करून वाहन एमएच १२ ईएफ १२००(चालक -सदानंद मगरध्वज डोके रा. धानोरा ता.निलंगा) तर दुसरे वाहन एमएच०६ एफजे ९१६६ (चालक -संतोष शहाजी घोरपडे रा.श्रीगोंदा ता. श्रीगोंदा) यांच्यासह मुद्देमाल ताब्यात घेतला. पुढील तपास उपवनसंरक्षक (प्रा.),पुणे महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) शितल राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी,एस.पी.राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.