Bhor News l विकास साधणाऱ्या निष्ठावंत भावाच्या हाताला साथ द्या : खासदार सुप्रिया सुळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर -वेल्हा-मुळशी तालुक्याच्या तळागळातील सर्वसामान्य जनतेबरोबर कायम राहून विकास साधला गेला.विकास हाच ध्यास मनी धरून आमदार संग्राम थोपटे यांनी तीन टर्म जनतेची मने जिंकली आहेत. विधानसभेचा विकास साधणाऱ्या निष्ठावंत भावाच्या हाताला साथ द्या असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
      भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालय मैदानावर रविवार दि.२९ अनंत निर्मल चॅरिटेबल  ट्रस्ट आयोजित तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या.यावेळी महाराष्ट्र महिला आघाडी काँग्रेस  अध्यक्ष संध्या सव्वालाखे,आमदार संग्राम थोपटे, राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा थोपटे, विश्वस्त पृथ्वीराज थोपटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अध्यक्ष रवींद्र बांदल,माजी सभापती बाळासाहेब थोपटे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे,युवा उद्योजक अनीलनाना सावले,बाजार समिती सभापती आनंदा आंबवले,खरेदी विक्री संघ चेअरमन अतुल किंद्रे आदींसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते तसेच हजारो महिला उपस्थित होत्या.
    कार्यक्रमादरम्यान गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमासाठी आलेल्या १० हजारहून अधिक महिलांना आकर्षक भेटवस्तू वाटप करण्यात आले.
To Top