सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरा नजिकच्या सांगवी ही.मा.ता.भोर येथील कॉलनीत विद्युत दुरुस्तीचे काम करताना विद्युत करंट लागल्याने सांगवी येथील एका वायरमेनचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.१० रोजी सायंकाळच्या वेळी घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील पंधरा वर्षांपासून भोर येथील महावितरण कंपनीच्या माध्यमातून काम करणाऱ्या सांगवी ही.मा.ता.भोर येथील अमोल सुरेश बांदल वय - ३२ यांचा महावितरणच्या खंडित झालेल्या विद्युत पुरवठयाचे काम करताना सांगवी- येवली येथील कॉलनीमध्ये काम करताना करंट लागला.तात्काळ स्थानिकांनी तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बांदल यांना उपचारासाठी भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच बांदल यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी महावितरणचे अधिकारी कर्मचारी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.