Bhor News l सावधान....l मुसळधार पावसामुळे भोर-आंबाडखिंड मार्गे मांढरदेवीला जाणारा रस्ता बंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 जोरदार वाऱ्यासह भोर तालुक्यात पाऊस झाल्याने आंबाडखिंड रस्ता मांढरदेवीला जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. पुणे जिल्हासह राज्यातून येणाऱ्या वाहन चालकांनी सावधानता बाळगून आंबाडखिंड मार्गावरून जाऊ नये असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.
        नवरात्र उत्सव सुरू आहे राज्यातून येणाऱ्या काळुबाई देवी भक्तांनी तसेच वाहन चालकांनी आंबाडखिंड रस्ता अतिवृष्टी झाल्याने बंद झाला आहे. तरी भाविक भक्तांनी खंडाळा घाट रस्त्यावरून वाई मार्गे काळुबाई देवीला जावे असे सांगण्यात आले.घाट रस्त्यावर पावसामुळे माती तसेच दगडी वाहून आल्याने रस्ता बंद झाला आहे.
To Top