सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विविध कौटुंबिक नाटके,दांडीया,भोंडला व होम मिनिस्टर सह वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने माळरानावर असलेल्या या भवानी मातेचा नवरात्र उत्सव उत्साहात पार पडला.
मंगळवारी कार्यक्रमाने उंची गाठत संपूर्ण गावातील व भापकर मळा येथील महिलांनी त्यांचे कलागुण व बुद्धी चातूर्याने होम मिनिस्टर कार्यक्रमात रंगत आणली. सासवड चे देवा भालेराव या कलाकाराने महिलांना सलग तीन तास हसवत ठेवले. येथील कोमल चेतन शिंदे ह्या होम मिनिस्टर ची मानकरी ठरली. सायली निखील भापकर, भारती चंद्रकांत पापळ, श्रद्धा सचिन भगत, शुभांगी संभाजी भापकर यानी या स्पर्धेत नंबर पटकावले.
ए.जी.आळंदीकर सराफ पेढी द्वारे सोने नथ व चांदीचा गणपती ,सरस्वती ई.बक्षीसे देण्यात आली. उत्सव कमिटी द्वारे पैठनी ,मिक्सर सह प्रत्येक सहभागी महिलेला बक्षीस अशा बक्षिसांचे आयोजन केले. अमरजा व ऍड गणेश आळंदीकर यांचे हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करणेत आले. येथील नवरात्र उत्सव कमिटी प्रमुख सरपंच शशांक पवार, दीपक पवार, कैलास पवार, अशोक चौधरी,बापुराव दगडे ई नी महिलांना बारामती सह विविध देवी मंदिरात सहल आयोजित केली तसेच सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.येथील भवानी माता मंदिरांचे जीर्णोद्धाराच्या काम देखील चालू आहे.