Bhor News l संतोष म्हस्के l जंगली सोन्याच्या भावात उच्चांकी वाढ : झाडे दुर्मिळ झाल्याने एका पेंढीला पन्नास रुपये भाव

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणावर असले तरी सध्या जंगलात आपट्याची झाडे दुर्मिळ झाल्याने दसरा सणाला लागणाऱ्या जंगली सोन्याचा भावात उच्चांकी वाढ झाली आहे.दरम्यान एका पेंढीला पन्नास रुपये बाजार भाव मिळत आहे.
     विजयादशमी (दसरा) सण म्हटलं की जंगली सोन्याला (आपट्याची पाने) अनन्य महत्व असते. मागील काळात तालुक्याच्या जंगली भागात आपट्याची झाडे मोठ्या प्रमाणावर असल्याने जंगली सोन्याचा तुटवडा भासत नव्हता.परिणामी दसऱ्याच्या सणाला आपट्याच्या पानांची पेंढी बाजारात दहा रुपये प्रमाणे विक्री केली जात होती.मात्र सध्या जंगल मोठ्या प्रमाणावर वाढले असले तरी दरवर्षी जंगलांना लागणाऱ्या वनव्यामध्ये आपट्याची झाडे जळून जात असल्याने आपट्याच्या झाडांची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे दसरा सणाला महत्त्वाचे असणारे जंगली सोने याची कमतरता भासू लागली. बाजारात एका पेंढीला ग्राहकांना ५० रुपये देऊन खरेदी करावी लागत आहे.ग्रामीण भागात नागरिक शेताच्या बांधावरील तसेच जंगलातील आपट्याच्या झाडाच्या पानांची पेंढी दसऱ्याच्या दिवशी घेऊन येतात यामुळे ग्रामीणच्या नागरिकांना जंगली सोने विकत घेण्याची गरज पडत मात्र शहर परिसरात आपट्याची झाडे( जंगली सोने) उपलब्ध नसतात.त्यामुळे भोर शहरात तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम पट्ट्यातील जंगली सोने विक्री करण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून ज्यादाचा भाव देवून खरेदी केले जाते.
---------------
... रुपये कमवायची संधी मिळते
शहरी भागात आपट्याची झाडे नसल्याने नागरिकांना दसऱ्याच्या सणाला आपट्याची पाने (जंगली सोने)मिळत नाही.ग्रामीण भागात ठराविक ठिकाणी जंगलात तसेच शेताच्या बांधांवर आपट्याची झाडे आहेत. जंगलात फिरून त्या झाडांची पाने तोडून एकत्रित विक्रीसाठी भोर शहरात घेवून येतो. दसऱ्याचा सण आला की आपट्याच्या पानांच्या विक्रीतून दरवर्षी ...चार रुपये कमावण्याची संधी मिळते असे आपट्याची पाने विक्रेते यांनी सांगितले.
                                      
To Top