सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभा मतदार संघातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील भगिनींचा शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक आमदार बाळासाहेब चांदेरे यांच्या हस्ते सन्मान सोहळा रविवार दि .१३ रोजी पार पडणार आहे.
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना जनतेचे हिताची काढली असून ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना या योजनेचा मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासन महिलांसाठी विविध योजना राबवीत आहे. या योजना महिलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुळशी येथील बाळासाहेब चांदेरे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून आमदारकीसाठी उमेदवारी लढणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भोर- वेल्हा -मुळशी तालुक्यातील मतदार राजा चांदेरे यांच्या मागे उभा राहणार असल्याचे बोलले जात आहे. भोर येथील भोर-मांढरदेवी रोडवरील यशवंत मंगल कार्यालय ता.भोर या ठिकाणी रविवार दि.१३ रोजी माता भगिनींचा सन्मान सोहळा व भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बाळासाहेब चांदेरे माता भगिनींना मार्गदर्शन करणार असून माता भगिनींचे आशीर्वाद घेणार असल्याचे चांदेरे यांच्याकडून सांगण्यात आले.