सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोळोली ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप संपतराव काटे ( वय ५२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. कोळोली गाव ग्रामस्वच्छाता अभियान मध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आणण्यात संदिप यांचा महत्वाचा वाटा होता. बारामती पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती काटे तर पंचायत समिती सदस्य संपतराव काटे यांचे ते पुत्र होत.
तसेच कोळोली सोसायटीचे संचालक संतोष काटे यांचे ते थोरले बंधु होत.
.......................
COMMENTS