सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
विजयादशमीचा (दसरा)सण म्हटलं की आनंदाचा क्षण असतो.या आनंदाच्या क्षणात बुजुर्ग सवंगड्यांना बरोबर घेवून बालपण ते ९२ वर्ष न विसरता माजी मंत्री अनंतराव थोपटे विजयादशमी (दसरा) साजरा करीत आहेत असे बुजुर्ग सवंगड्यांनी सांगितले.
अनंतराव थोपटे यांनी आमदार ते मंत्री असताना एकदाही गावचा दसरा सण चुकविला नाही.सध्या त्यांचे वय ९२ असले तरी माजी मंत्री थोपटे हे दसऱ्या दिवशी गावदेवीच्या दर्शनाला आवर्जून उपस्थित राहतात.तर गावातील बुजुर्ग व्यक्तींसह, विसगाव खोरे,चाळीसगाव खोरे तसेच तालुक्यातील जनतेची खुशालीची विचारपूस करीत असतात.सवंगड्यांना बरोबर घेऊन ग्रामदैवत जननी माता देवीच्या छबिण्यात ढोल-ताशांच्या निनादात पाउंड काढून खेळ खेळणे.नागरिकांना शिलंगण भेट करणे अनंतरावजी थोपटे साहेबांकडून कधीही चुकले नाही.माजी मंत्री थोपटे यांनी २०२४ च्या दसरा सणाला गावात प्रत्यक्ष जुन्या जाणत्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन दसरा सणात सामील झाले होते.यावेळी ट्रस्ट अध्यक्ष गेनबा कुडले ,माजी सभापती बाळासाहेब थोपटे, बाळासाहेब भिलारे ,माजी सरपंच मुकुंद थोपटे, दत्तात्रय गरुड ,आनंदा पाटणे ,हनुमंत गरुड, रजनीकांत थोपटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS