सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्यावतीने २०२३-२४ चा सर्वोत्कृष्ट खत विक्रेते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला देऊन सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या आर्थिक वर्षात भोर तालुका खरेदी विक्री संघाने रासायनिक व भगीरथ खत विक्री व्यवहारामध्ये उत्कृष्ट काम केले आहे.चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच संचालक मंडळाने शेतकरी हित पहात तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य भावात खत पुरवठा केला.या पार्श्वभूमीवर पणन महासंघामार्फत पणन महासंघाच्या रविवार दि.२९ ला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भोर खरेदी विक्री संघाचा यथोचित सत्कार अध्यक्ष दत्ताञय पानसरे,उपाध्यक्ष रोहित निकम,व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबेपाटील,संचालक मंडळ यांच्याहस्ते करून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार खरेदी विक्री संघ अध्यक्ष अतुल किंद्रे,उपाध्यक्ष अतुल शेडगे,संचालक विजय शिरवले,सोमनाथ सोमाणी,नरेश चव्हाण यांना सुपूर्त केला.आमदार संग्राम थोपटे यांनी भोर येथे उत्कृष्ट कामगिरीबद्दल संघाच्या संचालक मंडळाचे अभिनंदन करून सत्कार केला.
--------------------
भात खरेदी करून तांदूळ विक्री करणार-----
आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची वाटचाल प्रगतीकडे सुरू असून शेतकऱ्यांना योग्य दरात खत विक्री केले.येणाऱ्या काळात शेतकऱ्यांकडुन भात खरेदी करुन तांदुळ विक्री करणार तर इंद्रायणी तांदुळाची प्रसिध्दी करणार आहे असे चेअरमन अतुल केंद्रे यांनी सांगितले.
COMMENTS