सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाचे शेतकऱ्यांचे हित पाहत एकसंघपणे कामकाज सुरू आहे.संघाच्या उत्कृष्ट कामकाजाचा बोलबाला राज्यभरात आसल्याने भोर खरेदी विक्री संघ कामकाज आदर्शवत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्यावतीने २०२३-२४ चा सर्वोत्कृष्ट खत विक्रेते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला मिळाल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी संघाच्या संचालक मंडळाचा सत्कार सन्मान करून अभिनंदन केले.यावेळी आमदार थोपटे बोलत होते.पणन महासंघामार्फत पणन महासंघाच्या रविवार दि.२९ ला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या समारंभात भोर खरेदी विक्री संघाचा यथोचित सत्कार अध्यक्ष दत्ताञय पानसरे,उपाध्यक्ष रोहित निकम,व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबेपाटील,संचालक मंडळ यांच्याहस्ते करून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष अतुल किंद्रे,उपाध्यक्ष अतुल शेडगे,संचालक विजय शिरवले,सोमनाथ सोमाणी,नरेश चव्हाण,संपत दरेकर,नथु साळेकर, बबन गिरे,दत्तात्रय कांबळे,विठ्ठल खोपडे,ज्ञानेश्वर भोसले,किशोर बांदल, बबन जाधव,दत्तात्रय बाठे,वसंत वरखडे, नंदा मोरे,सुजाता ,दिलीप वरे,मधुकर कानडे,नथु दामगुडे उपस्थित होते.