भोर विधानसभा l संतोष म्हस्के l भोर-वेल्हे-मुळशी ४७७ गावे..४ लाख १२ हजार ५५३ मतदार : ५६४ मतदान केंद्रांवर होणार मतदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असुन भोर विधानसभा मतदार संघातील निवडणुकी विषय आचार संहिता मतदान केंद्र,मतदान कार्यपद्धती यासाठी प्रशासनाकडुन तयार करण्यात आलेल्या तयारीची महिती भोर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय आधिकारी डॉ.विकास खरात यांनी दिली.
     यावेळी अधिकारी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे,तहसिलदार निवास ढाने,नायब तहसिलदार अजिनाथ गाजरे उपस्थित होते.भोर,वेल्हे,मुळशी तालुक्यात ४७७ गावे असुन भोर तालुक्यात २४०,वेल्हे ९६ तर मुळशीत ३१८ असे एकुण ५६४ मतदान केंद्र आहेत.भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी भागातील बुरुडमाळ येथे सर्वात कमी मतदार २० महिला आणि २० पुरुष असे ४० मतदार आहेत.भोर तालुक्यात रायरेश्वर हे सर्वात उंचीवर आसलेले मतदान केंद्र असुन १६० मतदार आहेत.तीनही तालुक्यात एकुण ४ लाख १२ हजार ५५३ मतदार आहेत.मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुळशीतील ५ सोसायटीत ६ मतदान केंद्र तयार करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.एकाच टप्यात निवडणूक होणार असुन २२ आँक्टोबर ते २९ आँक्टोबर सुटटी दिवस वगळुन अर्ज स्विकारले जाणार असुन छाननी ३० आँक्टोबरला व चिन्ह वाटप त्याच दिवशी होणार आहे.अर्ज मागे घेणे मुदत ४ नोव्हेंबर मतदार २० नोव्हेंबर व मतदान २३ नोव्हेंबर मतमोजणी कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे होणार आहे.पुरुष मतदार २ लाख २३ हजार ३५६ तर महिला मतदार १ लाख ९८ हजार १९१,तृतीय ६ एकुण ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत. सुमारे ३ हजार कर्मचारी लागणार या शिवाय राखीव ५०० कर्मचारी असे ३५०० कर्मचारी ,७० झोनल आँफिसर आहेत .महिला मतदान कर्मचारी ज्या त्या मतदार संघातच काम करणार आहेत.तीन तालुक्यात गटविकास अधिकारी आचार संहिता प्रमुख नेमले आहे. १३ पुराव्यापैकी एक पुरावा दिला तरच मतदान करता येणार आहे.अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ सकाळी ११ ते ३ वेळेत असुन राजकीय पक्षाना एक सुचक लागतो.तर इतराना १० सुचक लागतात एका उमेदवाराला चार अर्ज भरता येतील.अर्ज २२ पासुन विक्रीसाठी तहसिल कार्यालयात ठेवले जाणार आहेत.उमेदवारांना अर्ज भरायला मदत केली जाणार असुन आँनलाईन अर्ज निवडणुक आयोगाने दिलेल्या अँपवर भरावा. प्रिंट काढुन निवडणूक अधिकारी यांच्याकडे २९ आँक्टोंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत जमा करावा.सी व्हीजीन अँपवर आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणार आहे.तक्रार झाल्यास त्यानंतर ५० मिनटात दखल घेतली जाईल असे निवडणूक अधिकारी डॉ .विकास खरात यांनी सांगितले. 
                                         
To Top