सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
पूर्वीपासूनच सांप्रदायाला अनन्यसाधारण महत्व असून धर्माचे व समाजाचे रक्षण सांप्रदायातून केले जात जाते.तर वाईट प्रवृत्तींना आळा घालण्याचे काम सांप्रदायाच्या माध्यमातून होत असते.सांप्रदाय समृद्ध जीवन घडविण्याचे उत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोर येथील राजगड भूषण २०२४ वारकरी सन्मान सोहळ्याप्रसंगी रविवार दि.२० आमदार थोपटे बोलत होते.कार्यक्रम प्रसंगी भोर,राजगड तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार,गायक, वारकरी व दिंडी चालक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तर राजगड भूषण जीवनगौरव पुरस्कार ह.भ.प.मारुती बदक यांना देण्यात आला.यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपाताई थोपटे,युवा नेते पृथ्वीराज थोपटे,काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,पोपट सुके ,माजी उपसभापती रोहन बाठे,महिला अध्यक्ष गीतांजली शेटे,गीतांजली आंबवले,माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे,युवा उद्योजक अनिल सावले, ख.वि.सभापती अतुल किंद्रे, राजगड संचालक राजेंद्र शेटे आदींसह भोर,राजगड तालुक्यातील वारकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------
कार्यकर्त्यांचे इन्कमिंग तर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप
आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भोर,राजगड तालुक्यातील इतर राजकीय पक्षातील शेकडो तरुणांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या हाताची बळकटी वाढवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर काँग्रेस पक्षाच्या तालुका पातळीवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप आमदार थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.