सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत असतात. जीवन जगताना त्यांना प्रत्येक संकटाचा मुकाबला करावा लागतो. त्यांच्या जीवनात हास्य व आनंद फुलवण्यासाठी मानसिक, शारीरिक गरजे बरोबरच भौतिक सुविधांच्या मदतीची गरज असते. समाजातील आर्थिक संपन्नता असणाऱ्या व्यक्तींनी दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन माऊली नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन व उद्योजक संतोष गिरमे यांनी केले.
दिवे (ता. पुरंदर) येथील जीवनवर्धिनी मतिमंद निवासी विद्यालयाला सोनोरी गावचे माजी सरपंच, उद्योजक सतीश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंपाकासाठी भांडी भेट दिली. भांडी वितरण कार्यक्रम प्रसंगी श्री. गिरमे बोलत होते.
यावेळी जीवनवर्धिनी निवासी मतिमंद विद्यालयाच्या प्रमुख रोहिणी भापकर,शरद लांघी, जिव्हाळा मित्र परिवाराचे संघटक हनुमंत लवांडे , संतोष गिरमे, सुनील लोणकर सतीश शिंदे, दिलीप कामठे , सचिन जगताप धनंजय गाडेकर ,दत्तात्रय गायकवाड ,भाऊसाहेब जगताप ,संजय खेनट अशोक जगदाळे, गोकुळ पोमण, आप्पासाहेब खेनट, नाना कुंभारकर, जीवन दळवी, संतोष वारे, विजय भोसले, विजय कुंजीर, गणेश म्हेत्रे ,सुभाष खेनट, रघुनाथ ढवळे,सलीम मणेर, राजश्री झेंडे, अनिता गायकवाड ,अलका चौधरी ,सविता मते, स्वाती होले ,अश्विनी कादबाने , नीता वढणे ,रूपाली भोईटे, छाया पवार आदी उपस्थित होते.
सतीश शिंदे म्हणाले ,येथील मतिमंद विद्यालयाला स्वयंपाकासाठी भांड्यांची कमतरता होती. माहिती कळताच वाढदिवसानिमित्त स्वयंपाकाची भांडी भेट दिली. भविष्यकाळात विद्यालयाला अजूनही काही मदत लागल्यास सदैव मदत करण्यास तयार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील लोणकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिता गायकवाड यांनी केले. आभार रूपाली जगताप यांनी मानले.
COMMENTS