Baramati News l पोलीस आणि पत्रकार यांचे कार्य समाजाला नवी दिशा देणारे : पोलीस अधीक्षक गणेश बिरादार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
येथील पोलिस आणि पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य असुन दोघांनी समन्वय ठेवुन केलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार यांनी केले.
          सुपे येथील पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस आणि पत्रकार संघाच्यावतीने ' मोरया ॲवार्ड ' बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बिरादार बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे होते. यावेळी अटल भुजल योजनेंतर्गत दिड कोटीचे बक्षिस मिळवुन राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल काऱ्हाटी गावाचा सत्कार करण्यात आला. 
         यावेळी पोलिस स्टेशनंतर्गत सुमारे १०७ गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सुपे येथील एकता मित्र मंडळाने प्रथक क्रमांक पटकविला. द्वितीय क्रमांक काऱ्हाटीचे महात्मा फुले मित्र मंडळाने मिळविला. तृतीय क्रमांक सुपे अंतर्गत गदादेवस्ती येथील नवजीवन तरुण मंडळाने पटकविला. तर उतेजनार्थ बक्षिस सुप्यातील महात्मा फुले तरुण मंडळ, काऱ्हाटी अंतर्गत रानमळा येथील हनुमान तरुण मंडळ तर सुपे येथील जय भवानी मित्र मंडळ आदींना देण्यात आले.  
    पुढील वर्षी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल. सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक विचार महत्वाचे आहेत. पत्रकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय असेल तर अनेक समाजोपयोगी प्रश्न त्वरीत मार्गी लागतात असे तहसिलदार गणेश शिंदे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार जयराम सुपेकर, कल्याण पाचंगणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकामी जयराम सुपेकर, दिपक जाधव, सचिन पवार, परिक्षक दिपक जगताप आदींचे सहकार्य मिळाले. 
        याप्रसंगी येथील पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी, सरपंच तुषार हिरवे, बाबुर्डीचे दत्तात्रय ढोपरे, काऱ्हाटीच्या दिपाली लोणकर, उपसरपंच गणेश शिंदे, शफिक बागवान, सोमनाथ कदम, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश जगताप, चिंतामणी क्षिरसागर, हेमंत गडकरी, विजय मोरे, चंद्रकांत साळुंके, काशिनाथ पिंगळे आदींसह पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच गावोगावचे गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
        या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सपोनी मनोजकुमार नवसरे यांनी केले. सुत्रसंचालन हेमंत गडकरी यांनी केले. स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे यांनी केले. तर आभार समीर बनकर यांनी मानले.  
        ...........................
        
To Top