सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
पाच वर्षे झोपलेले निवडणूक आली की जागे होतात.काहीतरी फंडा काढून लोकांमध्ये मतभेद करतात.हे तर विरोधकांच्या अंगवळणी पडले आहे. वारंवार काँग्रेस पक्षाने आणलेल्या विकास कामांच्या बाबतीत राजकीय श्रेयवाद करणाऱ्या मंडळींना धडा शिकवा असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोर शहरातील ५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार थोपटे शुक्रवार दि.४ बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे ,महिला तालुकाध्यक्षा गीतांजली शेटे,माजी उपनगराध्यक्ष तृप्ती किरवे, गीतांजली आंबवले, नंदाताई जाधव, रामचंद्र आवारे, गटनेते सचिन हर्नस्कर,माजी नगरसेवक गणेश पवार,अमित सांगळे, समीर सागळे,गणेश मोहिते,सुमंत शेटे,देविदास गायकवाड, ॲड.विश्वनाथ रोमन, चंद्रकांत मळेकर,बजरंग शिंदे, अमृता बहिरट आदींसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार थोपटे पुढे म्हणाले आत्तापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत सर्व समाजाला सामावून घेऊन उपयुक्त विकास कामे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली गेली आहेत.मागील काळात विकास करीत राहिलो आहे,पुढील काळात विकास कामे करीत राहू.जाहिरातीला हापापलेल्या विरोधकांना जनता त्यांची त्यांना जागा दाखवेल.
COMMENTS