Bhor News l सीमा तनपुरे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर - प्रतिनिधी
भोर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या, तनिष्का व्यासपीठ व उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांना राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या हस्ते तनिष्का व्यासपीठ नसरापूर यांच्या वतीने नवदुर्गा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
      सीमा तनपुरे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे तनिष्का नसरापूरच्या अध्यक्ष वैशाली झोरे यांनी सांगितले.यावेळी माजी उपसभापती लहूनाना शेलार, पोलीस हवालदार प्रमिला निकम, सरपंच उषा कदम,भाग्यश्री वरटे उपस्थित होते.

To Top